Home आरोग्य कोरोना : जिल्ह्यात आज नव्याने २६८ रूग्ण आढळले ; ४५१ झाले बरे...

कोरोना : जिल्ह्यात आज नव्याने २६८ रूग्ण आढळले ; ४५१ झाले बरे !

0
34


जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रुग्णालयाने दिलेल्या अहवालात आज दिवसभरात २६८ कोरोना बाधित नव्याने आढळून आले आहे, तर ४५१ जण कोरोना आजारातून बरे होऊन घरी परतले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

तालुकानिहाय आकडेवारी याप्रमाणे
जळगाव शहर-४७, जळगाव ग्रामीण -१६, भुसावळत-२२, अमळनेर-४, चोपडा-९, पाचोरा-५, भडगाव-४, धरणगाव-३, यावल-२३, एरंडोल-१०, जामनेर-६०, रावेर-२, पारोळा-६, चाळीसगाव-४१, मुक्ताईनगर-१, बोदवड-१२ आणि इतर जिल्ह्यातील ३ असे एकूण २६८ रुग्ण आढळून आले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४९ हजार ९७९ कोरोना बाधित आढळून आले असून त्यापैकी १ लाख ४४ हजार ११० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. सध्या जिल्ह्यात ३ हजार २२४ कोरोना रूग्ण विविध कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २ हजार ५८५ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.


Protected Content

Play sound