जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आज प्राप्त झालेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात एकुण एकही बाधीत रूग्ण आढळून आलेला नाही. तर चार रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.
जळगाव जिल्ह्यात आज एकही रूग्ण आढळून आलेला नाही. त्यात आज चार रूग्ण बरे झाल्याने आता ॲक्टीव्ह रूग्ण १२ राहिले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४२ हजार बाधित रूग्ण आढळून आले होते. त्यापैकी १ लाख ४० हजार रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तसचे २ हजार ५७५ रूग्ण उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.