Home आरोग्य कोरोना : जिल्ह्यात आज एकही रूग्ण आढळला नाही

कोरोना : जिल्ह्यात आज एकही रूग्ण आढळला नाही

0
23

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा रूग्णायाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात एकही बाधित रूग्ण आढळला नाही. तर जिल्ह्यातून एक रूग्ण बरा होवून घरी परतला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात एकही रूग्ण आढळला नसल्याने जिल्हावासियांसाठी दिलासादायक वृत्त आहे. दरम्यान १ बाधित रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने आता जिल्ह्यात ९ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ७३५ रूग्ण बाधित आढळून आले आहे त्यापैकी १ लाख ४० हजार  १५१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.


Protected Content

Play sound