जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात दिवसभरात एकही बाधित रूग्ण आढळून आला नाही. सलग दुसऱ्या दिवशी एकही बाधित रूग्ण आढळला नसल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
जिल्ह्यात आज दिवसभरात एक बाधित रूग्ण आढळून आला नाही. जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ४२ हजार ७८५ रूग्ण आढळून आला आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार २०२ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार ५७७ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.