रावेर प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोकण्यासाठी लॉकडाऊन वाढविण्यात आला असल्याने इतर जिल्हा व राज्यातील मजूरांना आपल्या इच्छीत गावी जाण्यासाठी ऑनलाईन किंवा संबंधित तहसील कार्यालयातील “कोवीड-१९ प्रवासी सहायता कक्ष” ला भेट द्यावे असे आवाहन तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी केले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी देशात १७ मे पर्यंत लॉकडाऊनची घोषण करण्यात आली आहे. दरम्यान, लॉकडाऊनमुळे परराज्यातील व परजिल्ह्यातील मजूर कामासाठी रावेर तालुक्यात किंवा जिल्ह्यात आलेले आहे. अशा मजूरांनी आपल्या इच्छीत स्थळी गावी जाण्यासाठी व त्यासाठी www.Jalgaon.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे . परंतु ज्या नागरिकांना ऑनलाईन अर्ज भरता येत नाही अशांनी नागरिकांसाठी रावेर तहसील कार्यालय , येथे “ कोवीड – 19 प्रवासी सहायता कक्ष ” तसेच “ कोवीड – 19 प्रवासी परवानगी कक्ष ” स्थापन करण्यात आलेला असुन , ज्या नागरिकांना प्रवासा बाबत काही अडचणी असल्यास त्यांनी तहसील कार्यालय , रावेर येथील कोवीड – 19 प्रवासी सहायता कक्षामध्ये विचारणा करावी असे आवाहन तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी केले आहे.