जळगाव प्रतिनिधी । जिल्हा रूग्णालयात संशयित कोराना म्हणून १५ जणांचे स्वॅब तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आले होते. त्यातील १४ जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहे. यात तीन, चार व पाच महिन्याच्या बाळांचा समावेश आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाची लक्षणे येताच तातडीने जिल्हा रूग्णालयात तपासणी करण्याचे आवाहन नागरीकांना करण्यात आले आहे. त्यानुसार ८ एप्रिल रोजी १५ जणांचे स्वॅब औरंगाबाद येथे तपासणी साठी पाठविण्यात आले आहे. त्यांचे अहवाल आज प्राप्त झाले असून त्यातील १४ जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहे. एक अहवाल येण्याचा बाकी आहे. यात तीन, चार व पाच महिन्याच्या बाळांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.