Home आरोग्य कोरोना: जिल्हा रूग्णालयात माजी मंत्री गिरीश महाजन यांची पाहणी

कोरोना: जिल्हा रूग्णालयात माजी मंत्री गिरीश महाजन यांची पाहणी


जळगाव प्रतिनिधी । राज्यात मोठ्या प्रमाणावर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयातील कोरोना आयसोलेशन कक्षाची पाहणी केली. यावेळी रूग्णांना योग्य ते उपचार करावे अश्या सुचना यावेळी महाजन यांनी वैद्यकिय अधिकारी यांना केल्यात.

यावेळी जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, उपअधिष्ठात डॉ. किरण पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे आणि रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते. यावेळी अपात्कालीन परिस्थित २० बेडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तर वार्डमध्ये व्हेंटिलेटरची व्यवस्था करून देण्याच्या सुचना देखील यावेळी केल्या आहेत.


Protected Content

Play sound