रावेर/जळगाव प्रतिनिधी । भिवंडी येथून जबलपूरकडे ट्रकमधून जाणाऱ्या प्रवाश्याला कोरोनाच्या लक्षणे आढळून आल्याने त्याला कोरोना संशयित म्हणून रावेर ग्रामीण रूग्णालयातून जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात पाठविण्यात आले.
याबाबत माहिती अशी की, भिवंडी येथून तीस वर्षीय एक प्रवासी जबलपूर येथे जाणाऱ्या ट्रकमध्ये बसला होता. हा ट्रक आज दुपारी १ वाजेच्या सुमारास येथील शासकीय विश्रामगृहाजवळ पोलीस वाहनांची तपासणी करत असतांना या प्रवाश्याला कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याने येथील पोलीसांनी त्याला ग्रामीण रूग्णालयात हलविले. ग्रामीण पोलीसात त्यांची तपासणी केल्यानंतर प्रवाश्याला जळगाव येथील जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ रवाना केले आहे.
दरम्यान ज्यावेळी प्रवाशी ट्रकमध्ये प्रवास करत होता त्यावेळी चालकासह तीनजण होतो. प्रवाश्याला लक्षणे जाणवू लागल्याने चालकाच्या सोबत असलेला व्यक्तीने पळ काढला आहे. तर चालकाला देखील आता ग्रामीण रूग्णालयात तपासणी करण्यासाठी पाठविण्यात आले तर ट्रकला रावेर पोलीस ठाण्यात लावून त्याला पाण्याने स्वच्छ धुण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००