बुलढाणा, अमोल सराफ | गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने सर्वांना घरात कैद केले. यातच मुले मैदानी खेळापासून दूर गेल्याचे चित्र पहावयास मिळत असतांना खामगाव येथे गुरू टेनिस स्पर्धा २०२१ चे यशस्वी आयोजन करण्यात आले.
बुलढाण्याच्या ग्रामीण भागातील खामगाव येथे गुरू टेनिस स्पर्धा २०२१ या स्पर्धेत १४ आणि १८ वर्षांखालील मुलांनी सहभाग घेतला. ग्रामीण भागात टेनिस स्पर्धेचे आयोजन करून खेळास नवसंजीवनी मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे गेली २ वर्षे मुले फक्त मोबाईल आणि लॅपटॉप घेऊन खेळत आहेत. याशिवाय, गुरू टेनिस स्पर्धा २०२१ चे आयोजन करण्याचा विचार निश्चितच प्रेरणादायी म्हटल्यास वावगे ठरणार नाही याबाबत आमचे प्रतिनिधी अमोल सराफ यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूजला टेनिस कोर्टवरून याबाबत माहिती दिली.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/285438943546524