रावेर प्रतिनिधी | कोरोना काळात आमदार शिरीष चौधरी यांच्या माध्यमातून मतदारसंघातील जनतेसाठी १ कोटी १६ लाखाचा निधी खर्च करण्यात आला असून यात सॅनिटायझर, मास्क, अँटीजनटेस्ट,तसेच इतर आरोग्य औषधांचा समावेश आहे. हा सर्व निधी आमदार निधीतला आहे.साहित्य स्वरुपात रुग्णालयाला देण्यात आला असल्याची माहिती आ. चौधरी यांच्या कार्यालयाने जाहीर केली आहे.
सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचाआमदार शिरीष चौधरी यांच्या कार्यलया कडून मिळालेल्या माहीती नुसार रावेर व यावल तालुक्यात आमदार निधीतुन १ कोटी १६ लाख २७ हजार ६६७ रूपये साहित्य खरेदी करून रुग्णालयांना देण्यात आले.यात शववाहिका व रुग्णवाहिका सुध्दा आहे. कोरोना काळात अनेकांची जिवन यात्रा संपली अनेक संसार उध्वस्त झाली असतांना आमदार शिरीष चौधरी यांनी खर्च केलेल्या निधीमुळे कोरोना काळात रुग्णालयांना संजीवनी मिळण्यास मदत झाली. दरम्यान तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी साहित्य स्वरुपात मदत मिळाल्याची माहिती दिली. तसेच याच काळात अनेकांनी लोकवर्गणी करून सुध्दा रुग्णालयांना साहित्य इतर औषधी दिले होते.
यावलसाठी ७३ लाखदरम्यान कोरोना काळात आमदार निधीतुन यावल तालुक्यात ७३ लाख ८९ हजार ७४६ रूपयांची साधन सामुग्री वाटप करण्यात आली असल्याचे आमदारांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीत नमूद करण्यात आले आहे. यामध्ये रुग्णवाहिका, शववाहिका, माक्स,अँटीजन टेस्ट किट्स,सॅनिटायझर,इतर साहित्य आमदार निधीतुन देण्यात आले. यामध्ये यावल व न्हावी रुग्णालये व फैजपुर नगर पालिका सुध्दा आहे.
रावेरसाठी ४२ लाख कोरोना काळात आमदार निधीतुन रावेर तालुक्यातील जनतेसाठी ४२ लाख ३७ हजार ९२१ रुपयांची साधन सामग्री वाटप करण्यात आली. यामध्ये देखिल मास अँटीजन टेस्ट किट्स व सॅनिटायझरसह इतर साहित्य होते. हे रावेर व पाल रुग्णालयांना देण्यात आले होते.यामध्ये एक शववाहिनी आहे तर रावेर नगर पालिकेला सुध्दा अँटीजनटेस्ट किट्स साठी तीन लाखाचा निधी दिल्याचे आमदार कार्यालया कडून माहिती देण्यात आली.
भयावह परिस्थिती कधी बघितली नाही आ.चौधरीकोरोना काळात इतकी भयावह परिस्थिती कधी बघितली नाही. रावेर व यावल मतदारसंघात आम्ही कोरोना काळात जनतेला जेवणाची व्यवस्था केली. सुमारे एक करोडच्या वर निधी रुग्णालयांना उपलब्ध करून दिला. किराणा किट्स व मास्क, अँटीजन किटच्या स्वरूपात मदत केलेली आहे. जनतेला वाटत असले तरी अजुन कोरोना संपलेला नाही. पुढची लाट लहान मुलांवर येण्याची शक्यता असून सर्वांनी काळजी घेण्याचे अवाहन आमदार शिरीष चौधरी यांनी केले आहे.