जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक स्तरावरून युद्धपातळीवर काटेकोर पावले उचलले जात आहे. या कठीण प्रसंगी मदत म्हणून आमदार राजूमामा भोळे हे शासकीय कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप करत आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी आमदार राजूमामा भोळे हे मास्कचे वाटप करत आहे. यानुसार आमदार भोळे यांनी महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी तीन हजार मास्क सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करत आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याकडे सुपूर्द केलेत. याप्रसंगी उद्योजक सुनील मंत्री उपस्थित होते. याच प्रमाणे आमदार भोळे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसाठी दोन हजार मास्क पोलीस उपाअधीक्षक नीलाभ रोहन यांच्याकडे सुपूर्द करून आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले .