कोरोना : रेल्वे तिकिटात आर्थिक घोळ ; डॉ. नितू पाटील यांचा आरोप

भुसावळ, प्रतिनिधी | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेतर्फे आरक्षित तिकीट रद्द करण्यात आले होते. या आरक्षित तिकिटांचे रक्कम परत करतांना पूर्ण तिकिटाचे पैसे न देता जीएसटी व इतर सेवांची रक्कम कमी करून दिले जात आहे. यात मोठा आर्थिक घोटाळा झाला असल्याचा दावा डॉ. नितू पाटील यांनी केला आहे. याबाबत वाचा त्यांच्याच शब्दात

“मित्रांनो,जय हनुमान…

जागतिक महामारी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लॉकडाउन जाहीर केले. आता आपण ४ टप्प्यात आहोत आणि माझ्या मते ५ टप्पा पण थोडे शीतलता घेऊन येणार…!

ह्या काळात केंद्र सरकारने सर्व दळणवळण साधनांची यातायात बंद केली. विमानसेवा, रेल्वे वाहतूक, बस सेवा, जल मार्ग आदी आदी बंद केलेत .नक्कीच ह्यामुळे ज्यांनी ज्यांनी बाहेरगावी जाण्याचे नियोजन केले असेल ते कोलमडले.

ज्यांनी ज्यांनी रेल्वे तिकिट काढून सीट आरक्षित केले असेल त्या सर्वांसाठी रेल्वे प्रशासनाने बातमी प्रसिद्ध केली की, ज्यांनी ऑनलाईन तिकिट काढले असेल त्यांचे तिकीट automatically कॅन्सल होईल आणि तिकीट परतावा रुपये अकाउंटवर जमा होतील. आरक्षण खिकडीवर २६ मेपासून प्रक्रिया सुरू होईल आणि त्यासंबंधी कालावधी जाहीर केला आहे.

आता,आमचा पण लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच माझ्या सासुरवाडीच्या मूळ गावी कोथाळी, तामिळनाडू येथे जाण्याचा बेत होता. त्यासाठी ऑनलाईन रेल्वे तिकीट काढले. कोरोनामुळे रेल्वे रद्द झाल्या आणि तिकीट कॅन्सल होत तिकीट परतावा माझ्या बँक खात्यावर जमा झाल्याचे एसएमएस आले. मात्र,तिकीटाचा मूळ परतावा परत मिळाला. त्यावर लागलेला सेवा कर परत मिळाला नाही.लक्षात घ्या,आपण जेव्हा तिकीट काढतो तेव्हा तिकीट मूळ रक्कम, सेवा कर आणि  अपघात विमा  हे सर्व मिळुन तिकिटांची रक्कम होत असते. सेक्शन ४९ जीएसटी ऍक्ट २०१७ जो सरकारकडे दर महिन्याच्या २० तारखेला जमा होतो. आता माझे एक उदाहरण पहा, पीएमआर नंबर ६६४०३८३०२९, तिकीट २१००/- , आयआरसीटीसी फी जीएसटीसह ३५.४, प्रवास इन्सुरन्स जीएसटीसह ०.९८ एकूण भाडे २१३६.३८ रुपये.मी ऑनलाईन २१३६.३८ रुपये भरून सीट आरक्षित केली.   पण माझ्या खात्यावर जमा झाले ते फक्त, २१०० रुपये  म्हणजे ३६ रुपये रेल्वे प्रशासनाने परत केले नाही. जो जीएसटी/सेवाकर होता. आता जर रेल्वे बंद आहे, सेवाच दिली गेली नाही तर हा कर का कट केला?  रक्कम का नाही परत केली? हा फार मोठा आर्थिक घोळ आहे….? आता ज्या ज्या वेळेस नैसर्गिक आपत्ती, रेल्वे प्रशासन अपरिहार्य कारणे, आणी बाणी, युध्द जन्य परिस्थिती आदी आदी मध्ये ट्रेन कॅन्सल होत असतील तर त्यांना पूर्ण परतावा मिळायला हवा, रेल्वे बोर्ड कॉमर्सिअल सर्कुलर ४१ ,तारीख २३ जून २०१७ सेवाकर/जीएसटी सुद्धा परत ग्राहकाला द्यायला हवा,असे नमूद आहे.

मित्रांनो, लक्षात घ्या, माझे स्वतः चे ४ वेगवेगळे तिकीट, माझ्यासारखे भुसावळ मध्ये किती,  भुसावळ तालुक्यात किती, जळगाव जिल्ह्यात किती आणि महाराष्ट्र…? शेवटी संपूर्ण भारतातील रेल्वे तिकीट कॅन्सल होण्यारांची संख्या आणि न दिलेल्या सेवाकर परतावा किती होणार याचा अंदाज लावा….?  केवढा मोठा आकडा होईल,विचार करा…!

रेल्वे प्रशासन मार्फत केंद्र सरकारने चालवलेला हा, “करोना आणि रेल्वे तिकीट आरक्षण परतावा घोळ ….? ” आहे.

मी आज भुसावळ डीआरएम, जळगाव जिल्हा मा. खासदार, मा. रेल्वे मंत्रालय, मा. रेल मंत्री,मा. मुख्यमंत्री, मा. विरोधी पक्षनेते,मा. आमदार आदी आदी यांना ट्विटर द्वारे कळणार आहे. पाहू ते काय निर्णय घेतात …? तुम्ही पण यात येत असल्यास तुम्ही माझ्या सोबत ट्विट करा…!

तेव्हा काळजी घ्या…! घरात राहा…!

डॉ. नितु पाटील,
भुसावळकर

भ्रमण ध्वनी क्र. ८०५५५ ९५९९९

Protected Content