Home आरोग्य कोरोना : अमेरिकेत गेल्या २४ तासांत १५००हून अधिक लोकांचा मृत्यू !

कोरोना : अमेरिकेत गेल्या २४ तासांत १५००हून अधिक लोकांचा मृत्यू !


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अमेरिकेत कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या २४ तासांत १५०९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २३ हजारावर गेली आहे.

 

अमेरिकेत जगातील सर्वाधिक ५ लाख ८१ हजार लोक कोरोनाबाधित आहेत. अमेरिकेनंतर इटली सर्वाधिक कोरोनाबाधित असलेला देश आहे. फ्रान्समध्ये कोरोनामुळे मृतांचा आकडा १५ हजारच्या जवळपास पोहचला आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत १ लाख ३७ हजार लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आतापर्यंत २८ हजारहून अधिक कोरोनातून बरे झाल्याची माहिती आहे. स्पेनमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत १७ हजार ५०० हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर १ लाख ७० हजारांवर कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. दुसरीकडे इटलीत १ लाख ५९ हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कोरोनामुळे इटलीत २० हजारहून अधिकांचा मृत्यू झाला आहे.


Protected Content

Play sound