सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । कोरोनाचा आपत्तीत येथील हाजी शब्बीर हुसेन अख्तर हुसेन बोहरी म्हणजेच बाबू सेठ यांनी केलेले कार्य हे अतिशय गौरवास्पद असल्याचे कौतुक प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी केले. ते सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
सावदा येथील हाजी अख्तर हुसैन बोहरी एच, पी, पेट्रोल पंप चे संचालक हाजी शब्बीर हुसैन अख्तर हुसैन बोहरी (बाबु सेठ) यांनी कोरोना काळात आपल्या घरी पायी परतणार्या परप्रांतीय मजूर लोकांचे होणार हाल पाहुन त्यांना मदतिचा हात दिला त्यांना जेवणा, सोबत अन्य सुविधा तसेच त्यांना महाराष्ट्र चे सीमे पर्यन्त वाहनाने पोहचविण्याची व्यवस्था आदी समाज उपयोगी कार्य केले. याचिच दखल घेऊन फैजपुर येथील सतपंथ चेरिटेबल ट्रस्ट तर्फे त्यांचेवर मानवता परमोधर्म हा लघुपट तयार करण्यात आला असून याचे अनावरण मंगळवारी जाफर लॉन्स वर मान्यवरांच्या उपस्थितत करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महामंडलेश्वर आचार्य जनार्दनहरिजी महाराज तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले, तहसीलदार उषाराणी देवगुणे, येथील महानुभाव मंदिराचे आचार्य सुरेशराज शास्त्री मानेकर बाबा, सावदा मुख्याधिकारी सौरभ जोशी, फैजपुर मुख्याधिकारी चव्हाण, नगराध्यक्षा सौ, अनीता येवले, सपोनि राहुल वाघ, नगरसेवक राजेश वानखेडे, राजेंद्र चौधरी, ग्रामीण रुग्णालय सावदा येथील डॉ सॅम बारेला, वीज वितरण कंपनी सावदा कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तर सतपंथ चेरिटेबल ट्रस्टतर्फे बाबू सेठ यांचा शाल श्रीफळ व मानचिन्ह आणि कोरोनावीर २०२० पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी मनोगतात बोलताना आचार्य सुरेशराज शास्त्री मानेकर बाबा यांनी बाबु सेठ यांनी केलेले कार्य हे हज किंवा कोणत्याही तीर्थस्थळा वर जाण्याहुन देखील मोठे असल्याचे सांगितले. तर प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी कोरोना काळात प्रशासन आपले कार्य करीत आहेच पण बाबु सेठ यानी आपल्या मालकिचा एक हॉल कोरोना संशयित रुग्णा साठी दिला तेथे साहित्य दिले हे करीत असतांना त्यांनी घरी परतणार्या मजूरांना देखील मदतिचा हात देत दुहेरी कार्य केले म्हणूनच त्यांचे हे कार्य खरोखर गौरवास्पद आहे असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात आचार्य जनार्दनहरिजी महराज यांनी देखील बाबू सेठ यांच्या कार्याचा गौरव केला.