मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात येणारे रेमडेसिविर या औषधाचा संपूर्ण स्टॉक अमेरिकेने विकत घेतल्याने हे औषध तीन महिन्यासाठी ऑऊट ऑफ स्टॉक झाले आहे.
अमेरिकेतील गिलीयड सायन्सेस ही कंपनी रेमडेसिविर हे औषध बनवते. रेमडेसिविरचा सर्व साठाच अमेरिकेने विकत घेतल्यामुळे आता या औषधाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. कोरोनाबाधित रुग्णांवर ट्रायल दरम्यान या औषधाचे सकारात्मक परिणाम दिसले होते. ‘कुठल्याही अमेरिकन नागरिकांना रेमडेसिविर औषधाची गरज असेल तर त्याला ते लगेच मिळालं पाहिजे’ म्हणून पुढच्या तीन महिन्यांसाठी रेमडेसिविरचे सर्व उत्पादन फक्त अमेरिकन नागरिकांसाठी करण्याचा ट्रम्प प्रशासनाने गिलीयड सायन्सेस बरोबर करार केला आहे. या औषधाच्या ५ लाख ट्रीटमेंट कोर्ससाठी कंपनीचा यूएस हेल्थ अँड ह्युमन सर्विसेससोबत एक करार झाला आहे.