कोरोनावर कोरोनिल प्रभावी’, रामदेव बाबांचा पुन्हा दावा

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । योगगुरू रामदेव बाबा यांनी स्वदेशी बनावटीची कोरोनिल  गोळी  प्रभावी ठरत असल्याचा दावा  पुन्हा केला आहे आधी  केंद्रीय आयुष मंत्रालयाने देखील त्यांना सुनावले होते. आता  आपल्या दाव्याच्या समर्थनासाठी त्यांनी  रिसर्च पेपरच प्रकाशित केला आहे.

 

 

या प्रकाशनासाठी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन हे देखील उपस्थित होते. त्यामुळे कोरोनिलच्या उपयुक्ततेवरून पुन्हा एकदा देशाच्या वैद्यकीय क्षेत्रात चर्चा सुरू होणार आहे.

 

गेल्या वर्षी कोरोनिल टॅब्लेट लाँच झाल्यानंतर त्यावरून वाद निर्माण झाला होता. या टॅब्लेट्सला त्यांनी केंद्रीय आयुष मंत्रालयाची आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची, तसेच आयसीएमआरची परवानगी देखील घेतली नव्हती. आयुष मंत्रालयाने कोरोनिल टॅब्लेटच्या तपासणीनंतर त्या प्रतिकारक्षमता वाढवणाऱ्या गोळ्या म्हणूनच विकण्याचे निर्देश दिले.

 

आता औषधांसाठी असलेलं CoPP-WHO GMP प्रमाणपत्र देखील मिळाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.  CoPP म्हणजेच Certificate of a Pharmaceutical Product हे कोणत्याही औषधाचा दर्जा ठरवण्यासाठी दिले जाते. WHO अर्थात World Health Organisation कडून ते दिले जाते.

मात्र, कोरोनिलबाबत अद्याप केंद्रीय आरोग्य मंत्रालय किंवा आयसीएमआरकडून कोणतेही निर्देश देण्यात आले नसल्यामुळे उपचार म्हणून फक्त मान्यताप्राप्त लशी, अर्थात सिरमची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन यांचाच वापर होऊ शकणार आहे.

Protected Content