वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) कोरोनावर मात करणारे औषध सापडल्याचा दावा अमेरिकन संशोधकांनी केला आहे. कोविड १९ व्हायरसवर रेमडेसिवीर हे औषध परिणामकारक ठरत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार असणाऱ्या डॉक्टर अँथोनी फॉउसी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. रेमडेसिवीर औषधांचा वापर करण्यात आलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याचे आढळून आले आहे, असे फॉउसी यांनी स्पष्ट केले आहे. रेमडेसिवीर देण्यात आलेल्या रुग्णांनी करोनावर ३० टक्के वेगाने मात केल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. प्रयोगांमधून या औषधांमुळे कोविड १९ या विषाणूचा प्रसार थांबवता येईल हे सिद्ध झालेय, असे मत फॉउसी यांनी व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांशी केले आहे. यासंदर्भात बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही ‘सकारात्मक बातमी’ असल्याचे म्हटले आहे.