टोसिलीजूमेबसह इतर औषधी जिल्हा प्रशासनातर्फे वितरीत करण्यात यावी -डॉ. फेगडे

यावल प्रतिनिधी । ऑक्सिजन व रेमडेसीवीर प्रमाणे टोसिलीजूमेब व इतर औषधी देखील जिल्हा कंट्रोल रूममधून वितरीत करण्यात यावी अशी मागणी आश्रय फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

 

अन्न व औषध मंत्री ना .राजेंद्र शिंगणे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात कोविड औषधीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालेला आहे. ऑक्सीजन आणि रेमडेसिविर यासाठी जिल्हास्तरावर कंट्रोल रूम स्थापन केलला आहे. त्यामुळे पुरवठा काही प्रमाणात सुरळीत होण्यास मदत झाली. त्याच धर्तीवर कोरोना रुग्णाची स्थीती गंभीर झालेली असते अशा वेळी टोसिलीजूमेब, यूरिनॅट्रोपिन, म्यूकरमायकोसीए मध्ये अम्फोटेरिसिनबी अशी औषधे लिहून दिली जातात. यावेळी नातेवाईकांची भटकंती होते व ते हवालदिल होतात अशा वेळेस परिचित लोकप्रतिनिधींना मागणी करीत असतात. परंतु लोकप्रतिनिधीसुद्धा त्यांची या औषधांबाबत मदत करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. आणि वेळेवर औषधी उपलब्ध न झाल्यामुळे रुग्णांना आपला जीव गमवावयाची वेळ येते. काही वेळेस औषधी उपलब्ध करण्यासाठी अव्वाच्या-सव्वा किंमत मोजावी लागत असल्याचेही उदाहरणे आहेत. वरील औषधी मीळत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. नागरिकांच्या तक्रारी आहेत. रुग्णांची आर्थिक लूट होऊन तो होरपळला जावू नये तसेच वितरण व्यवस्थेवर वचक निर्माण होण्याच्या दृष्टिने अन्न व औषधी र जिल्हा नियंत्रण कक्षाकडे वितरण व्यवस्था वर्ग करावी, जेणेकरून रुग्णांना वेळेवर औषधी उपलब्ध माफक दरात उपलब्ध होईल.असे डॉ. फेगडे यांनी निवेदनात म्हटले आहे.

Protected Content