मुंबई : वृत्तसंस्था । कोरोना काळात भारतीय स्टेट बँक सह देशातील सरकारी बँका घरी बँकिंग सेवा उपलब्ध करुन देत आहेत. बँकांनी डोर स्टेप बँकिंगसाठी टोल फ्री क्रमांक जारी केले आहेत. या नंबरवर कॉल करून तुम्ही घरातूनच बँकिंग सुविधा घेऊ शकता.
दाराजवळच बँकिंग सेवा सुरू झाल्यावर बँकेत जाऊन तिथे लांब रांगा लावण्याची गरज नाही. डोरस्टेप बँकिंगमध्ये बँका पैसे काढणे आणि जमा करणे यासह अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत.
बँकांच्या डोर स्टेप सेवेसाठी बँकेच्या शाखेत नोंदणी करावी लागणार आहे. बँकेच्या ई-सुविधा, ग्राहक कॉल सेंटर, वेब पोर्टल आणि मोबाइल अॅपद्वारे थेट बँकिंग सेवा घेऊ शकता. डोर स्टेप सेवा देण्यासाठी बँकांनी बँकिंग एजंट्सची नेमणूकही केली आहे.
चेक/ड्राफ्ट/पे ऑर्डर (पिक-अप) , नवीन चेक बुकसाठी मागणी स्लिप (पिक-अप) , चालान स्वीकृति (पिक-अप) , फॉर्म 15G आणि 15H (पिक-अप) , जारी केलेल्या सूचनांनुसार (पिक-अप) , खाता विवरणी (डिलिव्हरी) , फिक्स्ड डिपॉझिट पावत्या (डिलिव्हरी) , TDS/फॉर्म 16 प्रमाणपत्र (डिलिव्हरी) , ड्राफ्ट/पे-ऑर्डर (डिलिव्हरी) , गिफ्ट कार्ड (डिलिव्हरी) , रोख पैसे काढण्याची सेवा (डेबिट कार्ड / एईपीएस) , जीवन प्रमाणपत्र या सुविधा मिळणार आहेत
एसबीआयच्या या सेवेची माहिती अधिकृत वेबसाईटवर पाहायला मिळेल. यासेवेसाठी निकष लावण्यात आले आहेत. ज्या व्यक्तींचं वय ७० वर्षांपेक्षा अधिक आहे, जे बँकेत जाऊ शकत नाहीत ते या योजनेचा फायदा घेऊ शकतात. याशिवाय केवायसी जमा करावे लागणाऱ्या ग्राहकांना देखील याचा लाभ होणार आहे. मात्र, ग्राहकांच्या बँक खात्याशी त्यांच्या मोबाईल नंबर लिंक करावे लागणार आहेत. संयुक्त खाते, मायनर खाते, व्यावसायिक खातं यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध नसेल. स्टेट बँकेची शाखा असेल तिथून ५ किलोमीटर परिसरात त्या ग्राहकानं राहायला असलं पाहिजे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800 1037 188 किंवा 1800 1213 721 जारी करण्यात आले आहेत. या क्रमांकावर फोन करुन त्याय योजनेचा लाभ घेता येईल. स्टेट बँकेची वेबसाईट www.psbdsb.in वर देखील सेवेसाठी नोंदणी करताय येणार आहे.