कोरोनामुळे शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू !

मुंबई (वृत्तसंस्था) आठवड्यापूर्वी कोरोना विषाणूची बाधा झालेले मीरा-भाईंदर महापालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक हरिश्चंद आंमगावकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

 

साधारण आठवड्यापूर्वी नगरसेवक आंमगावकर यांना कोरोनाची लागण झाली होती. ठाणे येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. दुसरीकडे त्यांच्या पत्नीला नुकताच डिस्चार्ज देण्यात आला होता. तरर भाऊ आणि आई हे अद्यापही वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. दरम्यान, आंमगावकर शिवसेनेचे गटनेते होते.

Protected Content