कोरोनामुळे मरणारी माणसं जगायच्या लायकीची नाहीत- संभाजी भिडे

 

 

 

सांगली : वृत्तसंस्था । कोरोनामुळे मरणारी माणसं जगायच्या लायकीची नाहीत असं वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे.

 

कोरोना हा रोग नसून, करोनाने मरणारी लोकं जगण्याच्या लायकीची नाहीत असं ते म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी निर्बंधावरुनही टीका केली. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.

 

“मुळात कोरोना हा रोग नाही. कोरोनाने माणसं मरतात ती जगण्याच्या लायकीची नाहीत. कोरोना हा रोग नाही. हा ** वृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे. मानसिक रोग आहे. यामुळे काही होत नाही,” असं संभाजी भिडेंनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी निर्बंधांवरुन टीका करताना म्हटलं की, “दारुची दुकानं उघडी…त्यांना परवानगी दिली आहे. पण कोणी काही विकत बसला आहे त्याला पोलीस काठ्या मारतात. काय चावटपणा चालला आहे. हा नालायकपणा, मूर्खपणा चालला आहे”.

 

संभाजी भिडे यांनी याआधी एका कार्यक्रमात चक्क आमदारालाच मास्क काढायला लावला होता. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील आळसंद गावामध्ये एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमात संभाजी भिडे उपस्थित होते. यावेळी संभाजी भिडे यांनी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांना उद्धाटनाआधी तोंडावरील मास्क काढायला लावला. कोरोना होत नाही मास्क काढा असं सांगितल्यावर बाबर यांनीदेखील मास्क काढून टाकला होता.

 

संभाजी भिडे यांनी फक्त आमदारच नाही तर तिथे उपस्थित आणखी एका व्यक्तीलाही मास्क काढायला सांगितला. त्यानंतरच अनिल बाबर यांच्या हस्ते नारळ फोडून उद्घाटन करण्यात आलं.

 

Protected Content