कोरोनामुळे गरोदर महिला बाळांना धोका आणखीच वाढला

लंडन: वृत्तसंस्था । कोरोना महासाथीच्या आजारामुळे गरोदर महिला आणि त्यांच्या बाळावरील धोका आणखीच वाढला आहे. संसर्ग वाढल्यास दर १६ सेकंदाला एक मृत बालक जन्माला येणार असल्याचे म्हटले आहे. याचा सर्वाधिक फटका विकसनशील, गरीब देशांना बसणार आहे.

काही देशांमध्ये दुसरी लाट आली असल्याचे समोर आले. आता जागतिक आरोग्य संघटना आणि संयुक्त राष्ट्र बाल निधी कोषने (युनिसेफ) हा इशारा दिला आहे.
.

जागतिक आरोग्य संघटनेने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. प्रसुती दरम्यान अथवा प्रसुतीनंतर नवजात बालकाचा मृत्यू झाल्यास त्याला ‘स्टिलबर्थ’ म्हणतात. दरवर्षी जगभरात २० लाख स्टिलबर्थ घटना समोर येतात. बहुतांशी प्रकरणे विकासनशील, गरीब देशांतील आहेत. मागील वर्षी उप-सहारा आफ्रिका अथवा दक्षिण आशियातील जन्माला आलेल्या चारपैकी बालके हे तीन स्टिलबर्थची प्रकरणे होती.

युनिसेफच्या कार्यकारी संचालक हॅनरिटा फोर यांनी सांगितले की, प्रत्येक १६ सेकंदाला एक स्टीलबर्थचे प्रकरण होऊ शकते. योग्य देखभाल, प्रसुतीपूर्व देखभाल आणि सुरक्षित प्रसुती यामुळे अशी प्रकरणे रोखता येतील, असेही त्यांनी सांगितले.

 

कोरोनामुळे स्टिलबर्थच्या संख्येत वाढ होण्याचा धोका वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या आजारामुळे आरोग्य सेवा ५० टक्के घटली आहे. परिणामी ११७ विकासनशील देशांमध्ये आणखी दोन लाख स्टिलबर्थ होण्याची भीती आहे. प्रसुती दरम्यान नवजात बालकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण ४० टक्के आहे. सुरक्षित आणि प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्रसुती केल्यास अशी प्रकरणे रोखता येऊ शकतात. युरोप, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये याचे प्रमाण अवघे सहा टक्के आहे.

Protected Content