Home Cities अमळनेर कोरोनाबाधीत महिलेच्या संपर्कातील तिघांचे रिपोर्ट निगेटीव्ह

कोरोनाबाधीत महिलेच्या संपर्कातील तिघांचे रिपोर्ट निगेटीव्ह

0
16

जळगाव प्रतिनिधी । अमळनेर येथील कोरोना बाधीत महिलेच्या संपर्कात आलेल्या तिघांचे कोविड-१९ चाचणीचे अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती आज प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

दिनांक २० ते २२ एप्रिल या कालावधीत कोविड-१९ रूग्णालय, जळगाव येथे घेण्यात आलेल्या कोरोना संशयित रूग्णांपैकी ८ व्यक्तींच्या स्वॅबचे तपासणी अहवाल धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाले असून सर्वांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.

दरम्यान, निगेटिव्ह आढळून आलेल्या व्यक्तीपैकी तीन व्यक्ती ह्या अमळनेर येथील कोरोना बाधित महिला रूग्णाच्या संपर्कातील आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे यांनी दिली आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००


Protected Content

Play sound