नवी दिल्ली वृत्तसंस्था । आरोग्य मंत्रालयाकडून शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत कोविड-१९ चे ८६ हजार ०५२ नवीन रुग्ण दाखल करण्यात आलेत. एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५८ लाख १८ हजार ५७० वर पोहचलीय. गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ११४१ रुग्णांचा मृत्यू झालाय. आत्तापर्यंत देशात एकूण ९२ हजार २९० जणांनी प्राण गमावलेत.
केवळ सप्टेंबर महिन्यात आत्तापर्यंत २१ लाख ९७ हजार ३२५ नवीन रुग्ण दाखल झाले आहेत. १९ लाख ८१ हजार ३६३ रुग्ण आजारातून बरे झाले. मात्र एका महिन्यात २७ हजार ८२१ जणांना प्राण गमवावे लागलेत.
एकूण रुग्णांच्या संख्येपैंकी जवळपास ४७ लाखांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केलीय. २४ तासांत तब्बल ८१ लाख १७७ रुग्ण आजारातून बरे झालेत. एकूण ४७ लाख ५६ हजार १६४ रुग्णांनी करोनावर मात केलीय.
देशात सध्या ९ लाख ७० ११६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात रिकव्हरी रेट ८१.७४ टक्क्यांवर आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांचा दर १६.६७ टक्के आणि मृत्यू दर १.५८ टक्के आहे. पॉझिटिव्हिटी रेट ५.७६ टक्के आहे.
कोविड संक्रमणादरम्यान कोविड चाचण्यांवरही भर दिला जातोय. गेल्या २४ तासांत रेकॉर्डब्रेक १४ लाख ९२ हजार ४०९ नमुन्यांची चाचणी करण्यात आलीय. उल्लेखनीय म्हणजे, देशात आत्तापर्यंत ६ कोटी ८९ लाख २८ हजार ४४० नमुन्यांची चाचणी पार पडलीय.