पारोळा : प्रतिनिधी । आमदार चिमणराव पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने आता २६ मार्च रोजी राज्याच्या गृहखात्याकडुन कोरोनाने दगावलेल्या जळगांव जिल्ह्यातील ४ पोलीस पाटलांचा वारसांना प्रत्येकी ५० लाख रूपये अर्थसहाय्य जाहीर करण्यात आले आहे
आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांनी जिल्ह्यातील कोरोना काळात मृत झालेल्या पोलीस पाटलांचा वारसांना प्रत्येकी ५० लाख रूपये मदत मिळणार आहे .
मौजे पिंपरखेड ( ता.भडगांव) येथील पोलीस पाटील .विलास माणिक पाटील यांना कोरोनाची लागन झाल्यामुळे त्यांचे निधन झाले होते. कोरोना काळात संपुर्ण राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने ग्रामस्तरीय कोरोना समितीची स्थापना केली होती. त्यात पोलीस पाटील सचिव म्हणुन अत्यंत महत्वाची भुमिका बजावत होते. हे कर्तव्य बजावत असतांना कोविड १९ ची लागन होऊन स्व.विलास पाटील यांच्यासह ४ पोलीस पाटलांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला होता. त्यांचा वारसांना शासनाकडुन सानुग्रह सहाय्य मिळावे यासाठी आमदार चिमणराव पाटील यांनी ३० ऑगस्ट २०२० रोजी मुख्यमंत्री.उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केलेली होती.