पुणे (वृत्तसंस्था) करोना व्हायरसची संसर्ग झालेल्या रुग्णावर किंवा त्यांच्या कुटुंबीयांवर कोणी बहिष्कार टाकल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल,असा इशारा पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी दिला आहे.
काही दिवसांपूर्वी पुण्यात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाच्या कुटुंबावर गावकऱ्यांनी बहिष्कार घातल्याचे प्रकरण पुढे आले होते. त्यानंतर आता खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाची लागण म्हणजे पाप नाही. काही सोसायटी त्या कुटुंबावर बहिष्कार करत आहे. हे दुदैव आहे. जर कोणी असे करत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करणार असे दीपक म्हैसेकर म्हणाले. तसेच ज्या सोसायटीच्या अध्यक्ष आणि सचिव पदमुक्त करण्यात येईल, असेही ते म्हणाले.