सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्यांना मिळणार पुरस्कार
आपल्या माता-पित्याला नगराध्यक्ष निलेश चौधरी यांची अनोखी भेट
धरणगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या प्रतिकारासाठी अहोरात्र झटणार्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने येथे कोविड-१९ चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. धरणगावचे नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी आपल्या आई-वडिलांच्या विवाह दिनाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ही अनोखी भेट दिली आहे.
धरणगावच्या नगराध्यक्षांचे वडील सुरेश चौधरी व त्यांच्या मातोश्री सौ. लिलाताई चौधरी यांच्या विवाहाचा वाढदिवस हा ४ मे रोजी होता. याचे औचित्य साधून नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी कोविड-१९ चषकाची घोषणा केली आहे. याच्या अंतर्गत कोरोनाच्या प्रतिकारासाठी पहिल्यापासून प्रयत्न करणारे स्वच्छता खात्याचे कर्मचारी, पोलीस पथक आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्या विविध चमूंना सहभागी होता येणार आहे. धरणगाव शिवसेना शाख व एल.एस. फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये कोरोनाच्या युध्दात सर्वोत्तम कामगिरी बजावणार्या चमूला रोख पारितोषीकाने गौरविण्यात येणार आहे. यामध्ये सर्वोत्तम कामगिरी बजावणार्या सफाई कर्मचार्यांच्या पथकाला ५००१ रूपयांचे रोख पारितोषीत जाहीर करण्यात आले आहे. याच प्रकारे उत्कृष्ट कामगिरी करणारा पोलीस कर्मचारी व आरोग्य खात्याच्या कर्मचार्याला प्रत्येकी २००१ रूपयांचे रोख पारितोषीक दिले जाणार आहे.
कोविड-१९ चषक स्पर्धा ही सामूहिक व वैयक्तीक या दोन्ही प्रकारांमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांची प्रेरणा व मार्गदर्शनाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी, प्रांताधिकारी विनय गोसावी, मुख्याधिकारी जनार्दन पवार, तहसीलदार नितीन नितीन देवरे, पोलीस निरिक्षक पवन देसले व आरोग्य निरिक्षक श्री गांगुर्डे हे या स्पर्धेचे निरीक्षक आहेत. तर धरणगाव शहर शिवसेना शाख व नगरपरिषद प्रशासनाचे यासाठी सहकार्य लाभले आहे.
या संदर्भात लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश सुरेश चौधरी हे म्हणाले की, कोरोनाच्या प्रतिकारासाठी समस्त धरणगावकरांचे सहकार्य अपेक्षित आहे. राजकारणाचे जोडे बाजूला सारून सर्व जण यासाठी प्रयत्नशील आहेत. यात सर्वात मोलाची भूमिका ही कोरोना योध्दे बजावत असून त्यांना प्रोत्साहन मिळावे व खरं तर, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी या हेतूने कोविड-१९ चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याला माझ्या आयुष्यातील एका घटनेचा आयामदेखील आहे. माझ्या माता-पित्याच्या विवाहाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. त्यांना हे अनोखे व समाजाभिमुख गिफ्ट असल्याचे प्रतिपादन निलेश चौधरी यांनी केले.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००