कोरोनाच्या पार्श्वभूमी जिल्हाधिकाऱ्यांनी केले रक्तदान

 

बुलडाणा प्रतिनिधी । राज्यात सध्या रक्ताचा साठा कमी प्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे राज्य सरकारने रक्तदान करण्यासाठी आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्‍हाधिकारी सुमन चंद्रा यांनी गुरूवारी रक्तदान करून जिल्हावासीयांना समोर जणू काही एक उदाहरण ठेवले आहे.

कोरोना संकटात ज्या पध्दतीने त्या जलद गतीने निर्णय घेत आहे आणि जिल्हा संभाळत आहे ते प्रशंसनिय आहे. जिल्हाधिकारी सुमन चंद्रा ह्या कॅबीनमध्ये बसून न राहता प्रत्यक्ष रस्त्सावर उतरून स्थितीवर लक्ष ठेवून आहे. पेट्रोलपंप बंदची अफवा उठल्यानंतर रात्री ९ वाजले तरी त्या थेट पंपावर पोहोचल्या होत्या. कुणालाही कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेत लोकांना दिलास देण्याचे काम त्या अविरतपणे करत आहे. आणि त्यांनी आज रक्तदान केले.

जेणेकरून सध्या राज्यात फक्त पंधरा दिवस पुरेल एवढा रक्तसाठा आहे आणि कुठेतरी हा रक्तसाठा वाढावा याकरिता स्वतः रक्तदान करून कृतीतून सर्व जिल्हावासीयांना समोर जणू काही एक उदाहरण ठेवले. सरकारी अधिकारी म्हटले म्हणजे उंटावरून शेळ्या हाकणे भूमिका सर्वत्र दिसून येते. पण आज सर्वत्रचा प्रादुर्भाव भीती सर्वत्र पसरत असतांना एका महिला कर्तव्यदक्ष अधिकारीने कृतीतून उदाहरण देत ‘लीड फ्रॉम द फ्रंट’ची भूमिका सर्वांसमोर ठेवली आहे. असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही त्यामुळे नागरिकांना कुठेतरी दिलासाचे वातावरण निर्माण होणारच आहे. पण सोबत आपण सर्व उठून या कोरोनावर विजय मिळून असे वातावरण संपूर्ण जिल्ह्यात तयार होत आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Protected Content