जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या लाटेसाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज आहेत. यासाठी १० हजार बेडची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.
शहरातील कांताई हॉल येथे ऑल इंडीया सेंट्रल आर्म्ड फोर्सेस एक्स सर्व्हीसेमेन वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने शहीद जवान परिवार सन्मान सोहळा व माजी सैनिक मार्गदर्शन शिबीराच्या आयोजित कार्यक्रमानंतर ते बोलत होते. पालकमंत्री पुढे म्हणाले की, येत्या दोन दिवसात येणाऱ्या कोरानाचा अहवाल पाहून जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागातील प्रमुख वैद्यकिय अधिकारी यांची बैठक घेण्यात येणार आहे. लॉकडाऊनच्या काळात विविध स्वयंसेवी व सेवाभावी संघटनांची देखील यावेळी मार्गदर्शन व मदत घेतली जाणार आहे. कोरोनाची दुसरी लाट रोखण्याकरीता जे काही प्रयत्न करता येईल ते प्रयत्न आपण करणार आहोत. कोरोना प्रादुर्भाव सर्वांच्या मदतीने आटोक्यात आणणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/832182277615278/