नवी दिल्ली वृत्तसंस्था । भारत आणि इस्रायलचे वैज्ञानिक एकत्रितपणे चार नवीन पद्धतीचा शोध घेत आहेत, ज्यामुळे कोरोनाचे निदान काही मिनिटात होऊ शकणार आहे. यासाठीच इस्रायलच्या वैज्ञानिकांचे एक पथक या आठवड्यात भारतात येणार आहेत. भारत आणि इस्रायल मिळून ज्या चार पद्धतींचा अभ्यास करत आहेत. जर त्या यशस्वी झाल्या तर एक मोठे यश भारताला मिळू शकते.
भारत आणि इस्रायलचे वैज्ञानिक जो शोध लावणार आहे. त्यामध्ये एकूण चार पद्धतींवर वैज्ञानिक अभ्यास करणार आहेत. यातील दोन कोरोना तपासणी आहेत. ज्यामध्ये काही मिनिटात कोरोनाचे निदान होऊ शकते. तर तिसरी पद्धत ही सर्वात वेगळी आहे. यामध्ये कोणत्याही व्यक्तीचा आवाज ऐकून कोरोनाचे निदान केले जाणार आहे. तसेच चौथ्या पद्धतीत आपल्या श्वासातील सॅम्पल घेऊन रेडिओ वेव्हने कोरोनाचे निदान केले जाईल.
“इस्रायलचे वैज्ञानिक राजधानी दिल्लीच्या AIIMS येथे रिसर्च करणार आहेत. या पद्धतीने तपासणी करण्याची पहिली पद्धत इस्रायलमध्ये करण्यात आली आहे. शेवटची पद्धत भारतात केली जाणार आहे”, असे भारतातील इस्रायलचे राजदून रॉन मलकिन यांनी सांगितले.