जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी लावण्यात आली असतांनाच गत 24 तासांमध्ये तब्बल 319 कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. यात जळगाव शहरातील तब्बल 158 तर चाळीसगावातील 71 रूग्णांचा समावेश आहे.
आजचे आकडेवारी
जळगाव शहर – 158, जळगाव ग्रामीण-6, भुसावळ-12, अमळनेर-20, चोपडा-18, पाचोरा-4, भडगाव-7, धरणगाव-4, यावल-4, एरंडोल-0, जामनेर-4, रावेर-0, पारोळा-1, चाळीसगाव-71, मुक्ताईनगर-7, बोदवड-0 आणि इतर जिल्ह्यात 3 असे एकुण 319 रूग्ण आढळून आले आहे.
कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात एकुण 58 हजार 854 हजार रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 56 हजार 178 रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. यात आज जळगाव आणि चाळीसगाव प्रत्येक एक आणि भुसावळ शहरातील दोन असे चार रूग्णाचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.
Jalgaon corona news : 319 new positive in district