कोरोनाची लस प्रथम पत्रकारांना द्या — सतीश दांडगे

 

बुलढाणा, प्रतिनिधी । पत्रकारांची शासकीय समित्यांवर, जिल्हा नियोजन समिती, स्थानिक स्वराज्य समिती, आरोग्य समिती, शिक्षण समिती,व कोरोना प्रतिबंधक लस पत्रकारांना प्राधान्याने उपलब्ध करून द्या अशी मागणी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटना बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सतीश दांडगे यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निव्द्नाद्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ११ डिसेंबर रोजी तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना पत्रकारांच्या विविध प्रश्न संदर्भात निवेदन देण्यात आले होते. मात्र शासनाकडून कोणत्याच प्रकारची प्रतिक्रिया न आल्याने पत्रकार संघटनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवेदने, आंदोलन, लाक्षणिक उपोषण करण्यात आले आहे. यासह वयोवृद्ध पत्रकारांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पेन्शन योजना लागू करा, समाज कल्याण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या जात पडताळणी दाखल्याच्या अटींमध्ये शिथिलता अन्य त्या विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र विविध शासकीय दाखले महाविद्यालयातच उपलब्ध करून देण्यात यावे. यासह १४ मागण्या शासनाकडे लाक्षणिक उपोषण आंदोलन करून करण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघटनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सतीश दांडगे ,विदर्भ अध्यक्ष किशोर इंगळे, विदर्भ कार्याध्यक्ष एस. पी.हिवाळे, विदर्भ महासचिव उल्हास शेगोकार, जिल्हा कार्याध्यक्ष एन. के. हिवराळे, जिल्हा उपाध्यक्ष समाधान सुरवाडे, जिल्हा सहसचिव दादाराव प्रधान, जिल्हाप्रसिद्धी प्रमुख विजय वर्मा, श्रीकृष्ण भगत, अजय टप, कैलास काळे, अनिल गोठि, सय्यद इरफान, शेख सलीम शेख, विजय गवई आदीसह जिल्ह्यातील तमाम पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content