भुवनेश्वर : वृत्तसंस्था । कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्या धोका निर्माण झाला आहे. बंगळुरूमध्ये १० दिवसात ५०० हून अधिक मुलांना कोरोनाची लागण झाली आता ओडिशामध्ये १३८ मुलांना लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.
रविवारी ओडिशा सरकारच्या आरोग्य विभागाने कोरोना आकडेवारी जारी केली. १ हजार ५८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यात १३८ मुलांचा समावेश आहे. यामुळे राज्यातील एकूण आकडा ९ लाख ९४ हजार ५६५ पर्यंत पोहोचला आहे. कोरोनामुळे मृतांची संख्या ६ हजार ८८७ झाली आहे. रविवारी कोरोनामुळे ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. ६१६ रुग्णांना क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठवण्यात आलं आहे. राज्यात कोरोना रुग्णवाढीचा दर १.५३ टक्क्यांवर पोहोचला आहे
राज्यातील खोर्धा जिल्ह्यात सर्वाधिक ३७६ रुग्णांची नोंद झाली आहे. कटकमध्ये १६२, जाजपूरमध्ये ७७ रुग्णांची नोंद झाली आहे. दुसरीकडे २७ जिल्ह्यात १०० हून कमी रुग्ण नोंदवले गेले आहेत. गजपतीत एकही रुग्ण नाही. खोर्धा जिल्ह्यात १६, कटकमध्ये १२, नयागरमध्ये १३ मृत्यूची नोंद झाली आहे.
देशात गेल्या काही दिवसांपासून ४० हजारांच्या आसपास रुग्ण समोर येत आहेत. मात्र शनिवारी बाधितांमध्ये घट झाल्याचे पाहायला मिळाले. भारतात गेल्या २४ तासांत ३६ हजार ०८३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, ४९३ जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी ३८,६६७ नव्या रुग्णांची नोंद झाली होती