कोरोनाचा रिपोर्ट त्वरीत मिळावा आणि नॉन कोवीड रूग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करा- देवेंद्र फडणवीस (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. आज जळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आढावा घेतला आहे. यासाठी जिल्हा कोवीड रूग्णालयात जावून पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जावून जिल्हा प्रशासनाशी चर्चा केली. कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असून तपासणी अहवाल २४ तासात मिळावा तर नॉन कोवीड रूग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या सुचना फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्यात.

जळगाव जिल्ह्याचा कोरानाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता. संशयितांचे तपासणी अहवाल पाहिजे तेवढ्या प्रमाणावर होत नाही. ते वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी यांना सुचना देण्यात आल्यात आहेत. तपासणी अहवाल उशीरा येत असल्याने रूग्णांची प्रकृती खालावली जाते. त्यामुळे स्वॅब घेतल्यापासून २४ तासात तपासणी अहवाल आला पाहिजे, अश्या सुचना जिल्हाधिकारी यांनी झालेल्या बैठकीत फडणवीस यांनी केले.

रूग्णवाहिकेची कमतरता
गेल्या महिन्यात कोरोनाबाधित वृध्द महिलेचा मृतदेह शौचालयात आढळून आला होता ही खेदाची गोष्ट आहे. त्यानंतरही सुधारणा समाधानकारक झालेल्या नाहीत. जिल्हा कोवीड रूग्णालयात रूग्णवाहिकांची कमतरता असल्याने जामनेर तालुक्यातही रूग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने एकाचा मृत्‍यू झाला होता. यासाठी तात्काळ रूग्णवाहिका उपलब्ध करून द्याव्यात अशा सुचना माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.

नॉन कोवीड रूग्णाच्या उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या सुचना
जिल्हा रूग्णालय पुर्णपणे कोवीड रूग्णालय असल्याने नॉन कोवीड रूग्णांची मोठ्या प्रमाणावर फरफट होत आहे. अश्या रूग्णांना जळगावपासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. सामान्य रूग्णास वेळेत पोहचणे शक्य नाही. तसेच गोदावरी हॉस्पीटल संदर्भातही अनेक तक्रारी आहे. गोदावरी मेडीकल कॉलेजमध्ये सामान्य रूग्णाला मोठ्या प्रमाणावर लुट केली जात आहे. यासाठी जिल्हा रूग्णालयातच एक स्वतंत्र यंत्रणा उभारून नॉन कोवीड रूग्णांच्या उपचारासाठी सुविधा उपलब्ध करून देणे, अनेक किरकोळ गोष्टी पुर्ण करण्यासंदर्भात सुचनाही आरोग्य यंत्रणेला देण्यात आलेत.

(व्हिडीओ)

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/278101650299482/

Protected Content