‘कोराना’चा रुग्ण येताच इतर रुग्ण आणि कर्मचारी रुग्णालय सोडून पळाले !

रावेर (प्रतिनिधी) अवघ्या जगाला भयग्रस्त करून सोडणाऱ्या ‘कोराना’ चा रुग्ण बऱ्हाणपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणताच रुग्णालयातील इतर रुग्ण व त्यांच्या सोबत असलेले नातलग रुग्णालयाच्या बाहेर पळत सुटले. इतकेच नव्हे, तर रुग्णालयात सेवा देणारे कर्मचारी, नर्स देखील सैरा-वैरा पळत सूटल्याची घटना चांगलीच चर्चेत आली आहे.

 

मध्य प्रदेश शासनाकडून ‘कोराना’चा प्रसार रोखण्यासाठी बऱ्हाणपूर जिल्हा रुग्णालयाला आदेश देण्यात आले आहेत. यासाठी सु-सज्ज कोरोना आपात्कालीन कक्ष देखिल उघडण्यात आले आहे. याची रंगीत तालीम म्हणून दुपारी अकराच्या सुमारास रुग्णालयात अचानक सायरन वाजवित 108 नंबरची रूग्णवाहिका कोरोना पेशंटला घेऊन अत्यंत वेगाने रुग्णालयात पोहचते आणि गाडीतुन अचानक अंगात सफेद कलरचे कपडे घातलेला तोंडाला मार्क्स लावलेला एक जण उतरून कोरोना पेशंटला स्टेचरवर झोपवून रुग्णालयातील २२ नंबरच्या कोरोना आपतत्कालीन कक्षाकडे घेऊन जातात. त्यावेळी तेथे जवळच उभ्या असलेल्या एकाला हा ‘कोरोना’चा पेशंट आल्याची बातमी समजली. त्यानंतर रुग्णालयातील सर्व रुग्ण पलंग सोडून बाहेर पळु लागले. तसेच सेवा देणाऱ्या नर्स,कर्मचारी सुध्दा आपल्या रूमांमधून निघत सैरा-वैरा पळत सूटले. अखेर जिल्हा रुग्णालयाकडून ही ‘कोराना’ चा डमी रुग्ण असून ही रंगीत तालीम सुरु असल्याचे सांगितले, तेव्हा कुठे पेशंट व कर्मचारी यांच्या मनातील भिती गेली. त्यानंतर सर्व रुग्ण,कर्मचारी जिल्हा रुग्णालयात पुन्हा परत आले. यानंतर याबाबत मात्र एकच हास्यकल्लोळ माजला होता.

 

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today,
livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news

Protected Content