यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली येथे एका वयोवृद्ध शेतकऱ्याची आजाराला कंटाळुन आत्महत्या केल्याची घटना घडली याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
यासंदर्भात पोलीस सुत्रानी दिलेली माहीती अशी की, कोरपावली तालुका यावल येथील राहणारे घनश्याम राजाराम महाजन वय७३ वर्ष यांनी आज २१ जुलै रोजी सकाळी ६.३० ते ७.३० च्या सुमारास त्यांची पत्नी उषाबाई घनश्याम महाजन या घनश्याम महाजन यांना पाठदुखी आणी कंबरदुखीच्या वेदनाचा आजार असल्याने त्या वेदना असहाय होत असत ते नेहमी त्रस्त राहायचे आज देखील महाजन यांना अती वेदना होत असल्यानेच सकाळी चहा प्यालानंतर त्यांच्या पत्नी यांनी आपण आज दवाखान्यात जावु असे सांगुन नंतर त्यांनी एका तासाने घरातुन आयोडेक्स घेवुन गावातील असलेल्या त्यांच्या गुरांच्या पत्री गोठयात असलेल्या छतच्या एंगल पाईपला दोरी बांधुन गळफास घेवुन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. त्यांच्या पत्नी यांनी आरडाओरड केल्याने ग्रामस्थ त्या ठिकाणी आले व महाजन यांच्या गळयाचा दोर कापुन त्यांना तात्काळ उपचारासाठी यावलच्या ग्रामीण रुग्णालयात आणुन दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषीत केले. याबाबत मयताचा पुतण्या रोहीदास यशवंत महाजन यांनी पोलीसात खबर दिल्याने अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी असलम खान हे करीत आहे.