यावल, प्रतिनिधी I तालुक्यातील कोरपावली येथील जिल्हा परिषद मराठी व उर्दु शाळेला सदिच्छा भेट देऊन गटविकास अधिकारी नेहा भोसले व गटशिक्षणाधिकारी नईम शेख यांनी पाहणी केली.
तालुका पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नेहा भोसले व गटशिक्षणाधिकारी नईम शेख यांनी कोरपावली गावाच्या जिल्हा परिषदच्या मराठी मुलांची शाळेला भेट दिली असता जळगाव जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ .पंकज आशिया यांच्याकडील परीपत्रक अनुसार सोळा मुद्द्याच्या परिपत्रकानुसार शाळेत असलेल्या शैक्षणीक विषयावरील बाबींची माहीती घेत शाळेची पाहणी केली. मुख्याध्यापक धनराज दशरथ कोळी यांना विचारपूस केली व मिळालेल्या प्रश्नाचे उतरांनी त्यांनी समाधान व्यक्त केले. सदर यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नेहा भोसले ( आयएस ) यांनी कोरपावली जिल्हा परिषद शाळा भेटीच्या वेळेस गावाचे सरपंच विलास नारायण अडकमोल यांनी कोरपावली गावात भेट दिली म्हणून प्रथम नागरीक म्हणुन त्यांचा सत्कार केला . या वेळेस जिल्हा परिषदच्या उर्दू व मराठी शाळेतील शिक्षक निवृत्ती भिरूड, रमेश काळे, जाकिर शहा आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.