मुंबई (वृत्तसंस्था) कोणत्याही परिस्थितीत विद्यापीठांच्या परीक्षा घेतल्या जातील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
रविवारी दहावीचा भूगोलाचा पेपर आणि अकरावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी घेतला होता. त्यामुळे विद्यापीठाच्या परिक्षांबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतू उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने कोणत्याही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला नाही. तसेच परीक्षांसंबंधी कुलगुरुंची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती लवकरच अहवाल देईल. त्यानंतर त्यासंबंधी निर्णय घेतला जाईल, असे सामंत यांनी स्पष्ट केले आहे.