Home धर्म-समाज कोटेचा महिला महाविद्यालयात भारतरत्न डॉ. आंबेडकर यांना अभिवादन

कोटेचा महिला महाविद्यालयात भारतरत्न डॉ. आंबेडकर यांना अभिवादन

0
26


भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील श्रीमती प. क. कोटेचा महिला महाविद्यालयातील एन.एस.एस. विभाग आणि समारंभ समिती यांच्या संयुक्त विद्यमाने तर्फे दि. ६  डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिवादन कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. एस.बी. परदेशी यांनी केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंगला साबद्रा यांनी  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले.याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. व्ही. एस. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षक डॉ. सरोज शुक्ला, उपस्थित प्राध्यापक वर्ग व विद्यार्थिनी यांनी डॉ.आंबेडकर त्याच्या प्रतिमेचे पूजन केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. जान्हवी तळेगांवकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी समारंभ  समितीचे प्रमुख डॉ. एच पी नारखेडे यांनी परिश्रम घेतले.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य, उपप्राचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.


Protected Content

Play sound