चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव पोलीसांनी राबविलेल्या नाकाबंदी व कोंबिंग ऑपरेशन दरम्यान खुनाच्या आरोपातील भोंदुबाबाला चाळीसगाव पेालीसांनी अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी त्याला नाशिक पोलीसांच्या स्वाधिन केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, १९ एप्रिल रात्री ११ ते २० एप्रिल रोजी सकाळी ५ वाजेच्या दरम्यान जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंबिंग ऑपरेशन व नाकाबंदी करण्यात आले होते. पोलीसांनी संशयित आरोपील तुळशीराम बुधा सोनवणे (वय-३२) रा. पिंपळकोठे ता. बागलाण जि.नाशिक याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपल्या बायकोशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या प्रविण सोनवणे रा. पिंपळकोठे ता. बागलाण जि. नाशिक याचा गळफास देवून खून केला होता. याबाबत जायखेडा पो.स्टे. जि. नाशिक गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून संशयित आरोपी तुळशीराम सोनवणे हा फरार होतो.
या कोंबिंग ऑपरेशन दरम्यान दोन जणांना वारंट बजावण्यात आले. तर जुगार खेळणाऱ्या ६ जणांवर कारवाई करण्यात आली, वाहनांचे नियम मोडणाऱ्या २० दुचाकीधारकांवर करवाई करण्यात येवून १४ हजार ५०० रूपयांची दंड वसुल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, पोना राहुल सोनवणे, भूषण पाटील, पोकॉ विजय पाटील, रवींद्र बच्चे, निलेश पाटील, अमोल भोसले, आशुतोष सोनवणे, समाधान पाटील, शरद पाटील यांनी केली आहे.