यावल प्रतिनिधी । येथील डॉ. जाकीर हुसेन उर्दु विद्यालयाच इमारतीत बारावीच्या परिक्षेची पाहणी करण्यासाठी आलेले प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांना परिसरात वाळूचा मोठा साठा आढळून आल्याने त्यांनी यावर कारवाईचे निर्देश दिले आहेत.
याबाबत माहिती अशी की, सध्या बारावीची परीक्षा सुरू असून शनिवारी हिंदी विषयाच्या पेपरला तीन विध्यार्थी कॉपी करतानां आढळून आल्याने प्रांताधिकारी डॉ.अजीत थोरबोले यांनी कॉपी प्रतीबंधक का्यद्यान्वये कारवाई केली आहे. तर साने गुरूजी विद्यालयाच्या केंद्रास ही डॉ. अजीत थोरबोले यांनी भेट दिली असता केंंद्रांवर बैठे पथक आढळून न आल्याने केंद्र संचालकांच्या पथकास कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले असल्याचे सांगीतले. दरम्यान प्रांत अधिकारी यांच्या परिक्षा केन्द्राच्या भेटीच्या वेळीस त्यांना परिसरात वाळू साठा आढळून आला.
डॉ. जाकीर हुसेन उर्दु हायस्कुलच्या केंद्र तपासणी कार्यासाठी असतांना दरम्यानच्या काळात हायस्कुलच्या आवारात नविन ईमारतीच्या बांधकामा सुरू असुन या कामासाठी वापरण्यात येत असलेल्या वाळुचा मोठा साठा प्रांताधिकारी डॉ. थोरबोले, यांना आढळून आल्याने त्यांनी तहसीलदार जितेंद्र कुवर यांना वाळूचा पंचनामा करण्योच आदेश दिला. या वरून यावल तलाठी एस. व्ही. सुर्यवंशी यांनी १५ ब्रास वाळु चा पंचनामा केला असून पुढील कार्यवाहीसाठी अहवाल सादर केला असल्याचे तलाठी सुर्यवंशी यांनी सांगीतले.
दरम्यान, तालुक्यातील जवळपास सर्व केंद्रावर सर्रास कॉपी चालतअसल्याची व या कॉपी करण्याच्या प्रकारास संस्थाचालक , शिक्षक , लोकप्रतीनिधी यांचा त्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असल्याची तक्रार तसेच वर्गात सुरू असलेल्या कॉपीचे चित्रीकरण जिल्हाधिकारी यांचेकडे सोशल मीडीयाव्दारे पोहचले असल्याने जिल्हा प्रशासनाने यावल तालुक्यातील परिक्षा केंद्राची तात्काळ गंभीर दखल घेतली असून कॉपी करणार्यासह सहभागी असलेल्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी डॉ .अजीत थोरबोले यांनी सांगतले.
प्रांत अधिकारी डॉ. अजीत थोरबोले आणी तहसीलदार जितेन्द्र कुवर यांच्याकडुन वाळु माफीयांवर सातत्याने निष्पक्षपणे कार्यवाही होत असतांना मात्र शहरातील विस्तारीत परिसरातील कॉलनीत कोट्यवधी रूपये खर्च करून नविन अलीशान घरे बांधली जात असुन या बांधकामास वाळू कुठुन येत आहे याची तपासणी करण्याची आवश्यकता आहे. याकडे देखील महसुल प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.