कॉग्रेसचे नगरसेवक शेख असलम नबी यांच्या अपात्रतेला स्थगिती

 

यावल, प्रतिनिधी । येथील नगर परिषदेतील काँग्रेसचे नगसेवक शे. असलम शे. नबी यांचे अपात्रतेच्या अपीलावर नगरविकास मत्रालयाकडून स्थगिती मिळाली आहे.

यावलचे माजी नगराध्यक्ष शशांकदादा देशपांडे यांनी केलेल्या तक्रारी वरून जिल्हाधिकारी , जळगाव यांचे आदेश क्रंमाक पालीका एसआर नं .०६ / २०१९ दिनांक २८ ‘ ०१ / २०२० अनुसार तत्कालीन नगर परिषद सदस्य यांनी महाराष्ट्र नगर परिषद , नगर पंचायत व औद्योगीक नागरी अधिनियम१९६५ चे कलम ४४ (४ ) अन्वये अपील दाखल केले होते. यात विना परवानगीच्या बांधकामावरून काँग्रेसचे नगरसेवक शे. असलम शे. नबी यांना जिल्हाधिकारी यांनी २८ जानेवारीच्या आदेशान्वये अपात्र घोषीत केले होते. जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाविरुद्ध शे. असलम यांनी नगरविकास राज्यमंत्री यांच्याकडे अपील दाखल केले होते. सदर अपीलाचे अनुषंगाने नगरविकास मंत्रालयाच्या ६ नोव्हेंबरच्या आदेशान्वये म्हटले आहे की, शेख असलम शेख नबी यांना मिळालेल्या अपात्रतेच्या आदेशाला नगरविकास महाराष्ट्र शासनाकडून तात्पुरती स्थगिती देण्यात आली असल्याचे आदेशात नमूद आहे. येथील पालीकेचे आजपर्यंत नगराध्यक्षासह चार सदस्य अपात्र झाले त्यातील नगरसेविका रेखा युवराज चौधरी व शेख असलम शेख नबी यांच्या अपात्रतेस स्थगीती मिळालेली आहे. आपणास मिळालेल्या संधीचे सोन करण्यासाठी आपल्या प्रभागातील प्रंलबीत विकास कामांना पुर्ण करण्याकडे आपण आपले लक्ष केंद्रीत करणार असल्याचे नगरसेवक शेख असलम शेख नबी यांनी प्रस्तुत प्रातिनिधी बोलतांना सांगितले.

Protected Content