Home Cities जळगाव कॉंग्रेस शहर कमिटीतर्फे राज्यपाल कोश्यारींसह त्रिवेदीच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

कॉंग्रेस शहर कमिटीतर्फे राज्यपाल कोश्यारींसह त्रिवेदीच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

0
27

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य केले. त्याचा निषेध करण्यासाठी कॉंग्रेस  शहर कमिटीतर्फे राज्यपाल कोश्यारीसह सुधांशु त्रिवेदी यांच्या प्रतिमेला जोडे मारो  करण्यात आले.

 

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मराठवाडा विद्यापीठ पदवी प्रदान सोहळ्यात बोलतांना छञपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील हिरो होते. आताच्या काळात गडकरी, फडणवीस हे हिरो आहे. असे वक्तव्य करुन तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखवल्या. तसेच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांनी चारवेळा औरंगजेब यांना माफी मागितली असे बेताल वक्तव्य केले. दोन्हीनी असे बोलून महाराष्ट्राची अस्मिता दुखवली गेली. याचा निषेध करण्यासाठी जळगाव कॉंग्रेस कमिटीच्या वतीने कॉंग्रेस भवन येथे राज्यपाल कोश्यारीसह सुधांशु त्रिवेदी यांच्या प्रतिमेला जोडे मारो करण्यात आले.   याप्रासंगी कॉंग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष शाम तायडे, दिपक सोनवणे, जाकीर बागवान, मालोजीराव पाटील, जितेंद्र चांगरे, विशाल पवार, गोकुळ चव्हाण, उमेश तायडे, कफील अहेमद, बबलुभाई शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound