जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आज पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस भवनात आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी जळगाव शहर काँग्रेस माजी महानगराध्यक्ष डॉ. अर्जुन भंगाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी जळगाव शहर काँग्रेस माजी महानगराध्यक्ष डॉ. अर्जुन भंगाळे यांच्यासह शहर उपाध्यक्ष श्याम तायडे, प्रदेश प्रतिनिधी ज्ञानेश्वर कोळी श्रीधर चौधरी एनएसयुआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, पी. जी. पाटील, सेवादल महानगर अध्यक्ष कैलास महाजन, राहुल भालेराव, हेमंत चौधरी, मीरा सोनवणे, छाया कोरडे, योगिता शुक्ला आदी पदाधिकारी उपस्थित होते.
https://www.facebook.com/508992935887325/videos/421169935804687