Home Cities जळगाव कैलास सोनवणे यांची जळगावकरांसाठी खास हेल्पलाईन

कैलास सोनवणे यांची जळगावकरांसाठी खास हेल्पलाईन

0
89

जळगाव प्रतिनिधी । ज्येष्ठ नगरसेवक कैलास सोनवणे यांनी जळगावकरांसाठी विशेष हेल्पलाईन सुरू केली असून या माध्यमातून नागरिकांच्या विविध समस्यांचे निराकरण केले जाणार आहे.

अनोखी संकल्पना

श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष तसेच नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या तक्रार निवारण केंद्र म्हणजेच सुविधा केंद्राचे उदघाटन बालाजी पेठेतील मंडळाच्या कार्यालयात भरत अमळकर यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी महापौर सिमा भोळे, उपमहापौर डॉ. अश्‍वीन सोनवणे, स्थायी समीती सभापती जितेंद्र मराठे, भाजपा गटनेते भगत बालाणी, नवनाथ दारकुंडे, माजीम महापौर नितीन लढ्ढा, विरोधी पक्ष नेते सुनिल महाजन, प्रशांत नाईक, शिवसेना महानगराध्यक्ष शरद तायडे आदी मान्यवर उपस्थित होते.

लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव शहरातील नागरी सुविधांबाबत संपूर्ण शहरासाठी १८०० १०० ७२०० हा टोल फ्री क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. यावर कुणीही नागरिक आपल्या तक्रारी करू शकतात. या तक्रारींचे निराकरण करण्यात येणार असल्याची ग्वाही कैलास सोनवणे यांनी दिली आहे. या सुविधेचा शहरातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कैलास सोनवणे यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound