जळगाव, प्रतिनिधी । येथील के.सी.ई. अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालय जळगाव आणि तारकशास्त्र अकॅडमी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एम.बी.ए. २०२१ साठी पंधरा दिवसीय विनामूल्य ऑनलाईन पद्धतीने एम.बी.ए. सीईटीचे मोफत वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. २४ ऑगस्टपासून पंधरा दिवसीय एम.बी.ए. सीईटीसाठी मोफत वर्ग सुरु होणार आहे. अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयात या वर्षापासून एम.बी.ए. इन अॅग्रीकल्चर या नवीन अभ्यासक्रमाची सुरुवात होत आहे. यासंधीचा फायदा घेण्यासाठी अकॅडमीक डायरेक्टर संजय दहाड आणि कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय सुगंधी यांनी आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी प्रा. दिगंबर सोनावणे. मो.- ७७१९०१२४५२, प्रा. मयूर बोरसे – ९७६५९११२३० यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.