रावेर प्रतिनिधी । केळी पिक विम्या संदर्भात शासनाचे दोन दिवसात धोरण जाहीर झाल्यानंतरच केळी पिक विम्यासंदर्भात आंदोलन करायचे की नाही यासाठी शेतकऱ्यांची एक समिती गठीत करण्याचा निर्णय घ्यावा, आम्ही दोन्ही आमदार आपल्यासोबत असल्याची भावना आ. शिरीष चौधरी यांनी व्यक्त केली.
केळी पिक विम्याच्या बदललेल्या निकषाच्या संदर्भात रावेर कृषी उपन्न बाजर समितीत एक महत्वाची बैठक आयोजित केली होती. यावेळी मोठ्या संख्येने तालुक्यातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती. बैठकित आ. चौधरी पुढे म्हणाले की, विमा कंपनी त्यांचा अहवाल लवकरच शासनाकडे देणार आहे. मुख्यमंत्री एनडीआरएस या फंडातुन काही मदत करता येईल का ? यावर देखील सकारात्मक असल्याच्या भावना आ. चौधरी यांनी सांगितल्या. तालुक्यातील शेतकऱ्यांनी केळी पिक विमा काढू नये, यावर सर्वानुमते बहिष्कार टाकण्यात यावा, असा सुर शेतकऱ्यांमधून निघालाय. यावेळी राजिव पाटील, अमोल पाटील, विकास महाजन, रामदास पाटील, भागवत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले
यांची होती उपस्थिती
रावेरात आयोजित महत्वाच्या बैठकीला आमदार शिरीष चौधरी, आमदार चंद्रकांत पाटील, जि.प. अध्यक्षा रंजना पाटील, माजी आमदार अरुण पाटील, जि.प. सदस्य नंदकिशोर महाजन, बाजार समिती सभपती श्रीकांत महाजन, पं.स.सभपती जितु पाटील, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, जिल्हा बँक माजी उपाध्यक्ष राजीव पाटील, माजी जि.प. सदस्य विनोद तराळ, भाजपा जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष अमोल पाटील, शेवसेना तालकाप्रमुख योगराज पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, शेतकरी संघाचे चेअरमन पी.आर. चौधरी, सुनिल कोंडे, डॉ.राजेंद्र पाटील, राजेश वानखेडे, राजन लासुरकर, पितांबर पाटील, राजीव पाटील आदी उपस्थित होते.
बैठकीत कोण-काय म्हणाले....
केळी पिक विम्या संदर्भात अधिकारी वर्ग जुमानत नाही ही खरी गोष्ट आहे. यासाठी हिटो वापरल्या शिवाय पर्याय नाही. यावर दोन दिवसात शासन धोरण जाहिर करणार आहे. यात शेतकरी शेतकरी समाधान नाही झाले तर तुम्ही कराल त्या आंदोलनात आम्ही तुमच्या सोबत असेल.
– आ. चंद्रकांत पाटील, मुक्ताईनगरपालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील खुप प्रयत्न केले. निकष बदलणार नसेल एनडीआरएस दुसऱ्या पर्यायाने शेतकरी यांना मदत करणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी आम्हाला सांगितले. तरी सुध्दा निकष बदल करण्यासाठी बहिष्कार टाकावा लागला आंदोलन करावे लागले तरी आम्ही तुमच्यासोबत आहे.
– आ. शिरीष चौधरी रावेरपिक विम्या संदर्भात जिल्हात शेतकऱ्यांनी २ हजार ७०० लोकांनी पिक विमा काढला आहे. यामुळे शेतकऱ्यांना निकष मान्य असल्याचे संदेश जातो. काही शेतकऱ्यांमध्ये अजुन सुध्दा संभ्रमात आहे. यासाठी ही बैठक बोलवली आहे.
– श्रीकांत महाजन, सभापती, कृउबा, रावेरपिकविम्या संदर्भात राज्यस्तरावर आम्ही जाऊन आलो. राज्य व केंद्र यांच्यात समन्वय नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. बँकेचे अधिकारी माहिती देत नाही
-सुनिल कोंडे, शेतकरी, निंभोरातालुक्यातील एकाही शेतकऱ्यांनी पिक विमा काढू नये, यासाठी ठराव करावा. यासाठी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने राज्य व केंद्रीय कृषी मंत्र्यची भेट घ्यावी.
– सुरेश धनके, अध्यक्ष, भाजपा उत्तर महारष्ट्र किसान सभापिकविम्या संदर्भात लोकप्रतिनिधी यांनी आक्रमक होऊन शेतक-यांची बाजू मांडावी केंद्रांकडे राज्यसरकार सविस्तर पत्रव्यहार होत नाही तो पर्यंत निकष बदल करणे अशक्य आहे.
-नंदकिशोर महाजन, माजी उपाध्यक्ष, जि.प.जळगाव