नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अंदाजित तारखेच्या दोन दिवसांपूर्वीच यंदा केरळमध्ये मान्सून पोहोचल्याचा दावा खासगी हवामान एजंसी स्कायमेटने आज (शनिवार) केला आहे.
स्कायमेटच्या दाव्यानुसार, मान्सून 30 मे रोजी केरळमध्ये दाखल झाले आहे. भारतीय हवामान विभागाने 1 जूनला पाऊस केरळात धडकणार असल्याचे अंदाज वर्तविला होता. या तारखेच्या दोन दिवसांपूर्वीच मान्सूनने हजेरी लावल्याचे वृत्त समोर आले आहे. हवामान विभागाने एप्रिलमध्ये सांगितले होते, की या वर्षी मान्सून सरासरी राहणार आहे. त्यानुसार, यावेळी 96 ते 100 टक्के पाऊस पडण्याचे भाकित वर्तवण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या वर्षी मान्सून 8 जून रोजी केरळच्या किनारपट्टीला धडकले होते.