जळगाव प्रतिनिधी | एरंडोलकडून जळगावकडे येणाऱ्या केमिकलने भरलेला टँकर खोटे नगरच्या राधिका हॉटेल जवळील खड्ड्यात पलटी झाला. या अपघातात ट्रकची डिझेल टाकी फुटल्याने आग लागली. मात्र यावेळी महापालिका व जैन इरिगेशनच्या दोन बंबानी आग विझविली.
महापालिका व जैन इरिगेशनच्या दोन बंबानी आग विझवल्याने मोठी अनर्थ टळला. दुर्घटना घडल्याने रोडच्या दोन्ही बाजूने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. रात्री 9 वाजून 45 मिनिटांनी घडली. ड्रायव्हर व क्लिनरने वेळीच गाडीतुन उडी घेतल्याने दोघे बचावले. आता ट्रॅफिक सुरळीत झाले आहे. यावेळी तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ मदत केली. याबाबत तालुका पोलिसात रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते.