केमिकल कंपनीची फसवणूक करणाऱ्या फरार संशयीताला अटक

 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | लाखो रुपयांची बनावट बिले व त्या बिलांचे चेक तयार करून सह्या करणाऱ्या ऑफिस बॉयसह इतरांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील फरार संशयित आरोपीला गुरुवार 3 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता एमआयडीसी पोलिसांनी पिंप्राळा येथून अटक केली आहे.

अविनाश कोमल पाटील रा. पिंप्राळा जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यात सहभाग असलेल्या एकूण नऊ पैकी चौघांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे. इतरांच्या शोध घेणे सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की एमआयडीसी परिसरातील सुबोध चौधरी व त्यांचा भाऊ सुनील चौधरी यांची अनुक्रमे समृद्धी केमिकल्स आणि सुबोनिया केमिकल्स नावाची कंपनी आहे समृद्धी केमिकल्स मध्ये विशाल पोपट डोके हा ऑफिस बॉय म्हणून काम कामाला होता. विशाल डोके यांनी दोन्ही कंपन्यांच्या चेकवर बनावट स्वाक्षऱ्या करून 46 लाख 87 हजार 752 रुपयांची फसवणूक केली. बनावट सह्यांचे चेक बँकेतून वटले असल्याचे तपासात निष्पन्न झाले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेला अविनाश कोमल पाटील हा पिंप्राला येथे असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप शिखरे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत गुरुवारी ३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता त्याला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता ५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आले आहे. यातील इतर चौघेजण फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

Protected Content